आता चाकरी गजाननाची...
कोरोनाने साऱ्या जगाला फटका दिला. तो आर्थिक होता, शारीरिक होता आणि सामाजिक ही होता... अद्यापही तो कहर संपलेला नाही. मात्र, या अशा संकटाच्या काळात समर्थ गजानन महाराज कायम आपल्या सोबत असल्याची आणि अडचणीत तेच सावरून घेत असल्याची अनुभूती आमच्यासह अनेक भक्तांना येत असते. ती आम्हाला कायम आलेली आहे.
कोरोना काळात अनेकांना वेगवेगळ्या अनुभवांतून पुढे जावे लागले आणि अनेकांना आपल्या आयुष्यात बदल घडवून आणावे लागले. आम्ही सुद्धा यातून सुटलो नाही. कोरोनाचे कारण करून अनेक कंपन्यांनी कामगार कपात करून घेतली. असेच काहीसे आमच्या बाबतही घडले. गेल्या वर्षी जुलै महिन्यात एका गुरूवारीच आम्हाला नोकरी गमवावी लागली. आज गुरुवारी आपल्या आयुष्यात हा बदल होतो आहे, यामागे गजानन महाराजांची नक्कीच काहीतरी चांगली योजना असावी, असाच विचार आमच्या मनात आला. आम्ही दोघांनीही मग रोजगार मागणारे होण्यापेक्षा देणारे होऊ म्हणत दुसरी नोकरी न करता आता आपण गजानाचीच चाकरी करायची, असे ठरविले. अनुभव आणि माऊलींवरची श्रध्दा या बळावर 'समीर एडव्हर्टायझिंग एजन्सी' ची सुरुवात केली.
आम्ही दोन्ही 'समीर' नी हे काम सुरू केले. गजानन महाराजांची सेवा म्हणून व्यवसायाचा विचार न करता असे काही प्रकल्प करण्याचे आम्ही ठरविले. त्यानुसार नव्या वर्षाचे कॅलेंडर (दिनदर्शिका-२०२१) आम्ही केले. ते लोकांना खूप आवडले. आता महाराजांच्या प्रकटदिनाच्या पावन पर्वावर आम्ही भक्तांसााठी दैनिक गजानन पर्वचा किनवा गजानन नाम म्हणून ही 'श्री गजानन वंदना' ही पुस्तिका प्रकाशित करतो आहोत. त्यात गजानन बाावन्नी, काही स्तोत्र आणि विशेष म्हणजे गजानन विजय ग्रंथातला शेवटचा एकविसाावा अध्याय आम्ही वेगळ्या रूपात मांडलेलाआहे. संतस्वरूप दासगणू महाराजांनी तो विजयग्रंथामध्ये खूप रसाळ पद्धतीने मांडला आहे.तो ओविबध्द आहे आणि ती भाषाही त्या काळातली आहेे. प्रत्येकाला संपूूर्ण एकवीस अध्यायांचे पारायण करणे शक्य नसते. तेव्हा फक्त एकविसाावा अध्याय वाचला तर पारायणाचे पुण्य मिळते, अशी धारणा आहे, श्रद्धा आहे. म्हणून आम्ही हा अध्याय कथा स्वरूपात या पुस्तिकेत देत आहोत. तो सर्व माऊलींना आवडले,भावेेेल आणि आमची ही सेवा तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचेेेल, ही आमची श्रद्धा आहे.ही पुस्तिका आम्ही नि:शुल्क वितरीत करीत आहोत. त्याच्या उत्पादन खर्चासाठी काही माऊली भक्तांनी आम्हाला सहाय्य केले म्हणूनच आम्ही ही पुस्तिका प्रकाशित करू शकलो आणि विनामूल्य वितरित करू शकत आहोत. जाहिरात स्वरुपात आम्हाला ही मदत करणाऱ्याा सर्व भक्तांचे आम्ही काय ऋणी आहोत.
आम्ही समीर एडव्हर्टायझिंग ही कंपनी सुरू केली आहे. महाराजांच्या प्रेरणेतूनच आम्ही हे काम सुरू केलेले आहे. त्यांच्याच आशीर्वादाने यशस्वीपणे ते सुरू राहणार आहे. नोकरी नाही तर व्यवसायाच्या रूपात आम्ही संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांची चाकरी करतो, ही आमची भावना आहे. त्याच भावनेतून आम्ही भक्तांच्या सेवेत ही पुस्तिका रूजू करतो आहोत. या पुस्तिकेच्या रूपात भक्तांच्या काळजात, स्मरणात आम्हाला राहता येईल, हीच आमची यावरची मिळकत.
आपले
समीर श. मेश्राम +१९-९८६०३९२७७२
स्वप्निल (समीर) अ. तांबोळी +९१-९३७३९८०७९७
sameer.advt15@gmail.com
Comments
Post a Comment