Posts

आता चाकरी गजाननाची...

Image
                               कोरोनाने साऱ्या जगाला फटका दिला. तो आर्थिक होता, शारीरिक होता आणि सामाजिक ही होता... अद्यापही तो कहर संपलेला नाही. मात्र, या अशा संकटाच्या काळात समर्थ गजानन महाराज कायम आपल्या सोबत असल्याची आणि अडचणीत तेच सावरून घेत असल्याची अनुभूती आमच्यासह अनेक भक्तांना येत असते. ती आम्हाला कायम आलेली आहे.           कोरोना काळात अनेकांना वेगवेगळ्या अनुभवांतून पुढे जावे लागले आणि अनेकांना आपल्या आयुष्यात बदल घडवून आणावे लागले. आम्ही सुद्धा यातून सुटलो नाही. कोरोनाचे कारण करून अनेक कंपन्यांनी कामगार कपात करून घेतली. असेच काहीसे आमच्या बाबतही घडले. गेल्या वर्षी जुलै महिन्यात एका गुरूवारीच आम्हाला नोकरी गमवावी लागली. आज गुरुवारी आपल्या आयुष्यात हा बदल होतो आहे, यामागे गजानन महाराजांची नक्कीच काहीतरी चांगली योजना असावी, असाच विचार आमच्या मनात आला. आम्ही दोघांनीही मग रोजगार मागणारे होण्यापेक्षा देणारे होऊ म्हणत दुसरी नोकरी न करता आता आपण गजानाचीच चाकरी करायची, अ...